Maharashtra Police Bharti Written Exam Syllabus | महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम
देशसेवा करणे हे प्रत्येक युवकाचे स्पप्न असते. बऱ्याच युवकांना सरंक्षण सेवेत जाण्याची, देशसेवा करण्याची ईच्छा असते. सरंक्षण सेवेप्रमाणेच अंतर्गत कायदा व व सुवव्यस्था टिकविण्यासाठी पोलीस सेवा महत्वपूर्ण कार्य पार पाडते. महाराष्ट्र पोलीस हे देशातच नव्हे तर जगात नावलौकिक मिळवलेले आहे. त्यामुळेच बऱ्याच युवकांना पोलीस भरतीच्या माध्यमातून देशसेवा करण्याचे स्वप्न असते. पोलीस भरती मध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा असी प्रक्रिया असते. या आधीच्या लेखात आपण शारीरिक चाचणी विषयी माहिती मिळवली आहे. आतापर्यंत आपण हि माहिती पाहिली नसेल तर खालील पोष्ट हवर ती माहिती मिळेल त्यावर क्लिक करा.
तर आपण लेखातून पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम –
Police Bharti Written Exam Syllabus पाहणार आहोत . लेखी परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.
विषय Subject | प्रश्नQuestion | गुण Marks | वेळ Time |
गणित Mathematic | २५ प्रश्न 25 Question | २५ मार्क्स 25 marks | ९० मिनिटदिड तास 90 Minutes |
बौद्धिक चाचणी Reasoning | २५ प्रश्न 25 Question | २५ मार्क्स 25 marks | |
मराठी व्याकरण Marathi Grammar | २५ प्रश्न 25 Question | २५ मार्क्स 25 marks | |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी General Awareness | २५ प्रश्न 25 Question | २५ मार्क्स 25 marks | |
एकूण Total | १०० प्रश्न 100 Question | १०० मार्क्स 100 Marks |
- परीक्षेत निगेटिव्ह (Negative Marking) मार्किंग पद्धत असणार नाही.
- परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी वस्तुनिष्ठ (Multiple Choice Question – MCQ) असणार आहे.
- परीक्षेसाठी एकूण दिड तसाचा म्हणजे ९० मिनिटाचा कालावधी असेल.
- या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी ४० % मार्क्स असणे अनिवार्य आहे.
- प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी साधारणतः ५४ सेकंड मिळणार आहेत.
- विद्यार्थ्यंनी वेळेची नियोजन करून पेपर सोडवावा.
- निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवायलाच हवा.
सराव पेपेरम साठी येथे क्लिक करा…
पोलीस भरती लेखी अभ्यासक्रमात – Police Bharti Written Exam Syllabus – लेखी पेपर हा १०० मार्क्सचा व १०० पप्रश्नांचा असेल. म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी १ मार्क्स असेल. या पेपर मध्ये गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण आणि सामान्य व चालू घडामोडी यावर प्रत्येक २५ मार्क्सचे २५ प्रश्न असणार आहेत. म्हणजेच एकूण १०० मार्क्स साठी १०० प्रश्न असणार आहेत. सर्व विषय हे १२ वि लेव्हलचे असणार आहेत. सदर पेपरचा अभ्यास करण्यासाठी “शालेय अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तके म्हणजेच इयत्ता ५ वि ते १२ वि पर्यंतच्या पुस्तकांचा अभ्यास करावा”. (गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्र, मराठी व्याकरण इ,) आम्ही सुद्धा फ़प्रत्येक विषयावर सविस्तर मार्गदर्शनपर लेख उपडेट करत राहू वेबसाईट नेहमी पाहत राहा. सदर विषयांत खालीलप्रमाणे विस्तृत मुद्दे राहणार आहेत.
Points Cover in Police Bharti Written Exam Syllabus
Sr. No. | विषय – Subject | महत्वपूर्ण घटक – Important Point |
1 | गणित Mathematic | संख्या व संख्येचे प्रकार, बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूलम, शेकडेवारी, कसोट्या, मसावि आणि लसावि, पूर्णांक व अपूर्णांक, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, दशमान पद्धत, नफा तोटा, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, घड्याळ्यांवर आधारित प्रश्न, घातांक व घाटांकाचें नियम |
2 | बौद्धिक चाचणी Reasoning | वेण आकृती, क्रमवार संख्या संच, वेगळी आकृती, संख्या ओळखणे, कालमापन, रांगेवर आधारित प्रश्न, वेगळे पद ओळखणे, सांकेतिक भाषा, आरसातील आकृती, पाण्यातील प्रतिबिंब, दिशा आणि अंतर, घडाळ्यावर प्रश्न, नाते सबंध, ई.. |
3 | मराठी व्याकरण Marathi Grammar | म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समास, प्रयोग, नाम, सर्वनाम, क्रियापद, काळ, विशेषण, संधी, मराठी वर्णमाला, ई .. |
4 | सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीGeneral Awareness & Current Affairs | इतिहास,भूगोल, सामान्य ज्ञान, राज्यघटना, संगणक, लेखक, पुस्तके, पुरस्कार, शासन निर्णय, कला, क्रीडा, वाणिज्य, ई . विषयी चालू घडामोडी |
अशाप्रकारे महत्वपूर्ण घटक पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रमात असणार आहेत. त्यामुळे विदयार्थ्यांनी शारीरिक कसरती सोबतच लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करावी. विदयार्थ्यांनी साधारणतः वरील घटकांच्या आधारावर अभ्यास कारणेव चालू ठेवावे. पोलीस भरती साठी बाजारात बऱ्याच प्रकाशनांची पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु य पुस्तंकसोबतच शालेय अभ्यासक्रमातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या अभ्यास करणे महत्वपूर्ण व हितावह राहील. शालेय अभ्यासक्रम हा मुख्य आधार ठेवून बरेच प्रकाशन आपले पुस्तके बाजाराज आणत असतात. पोलीस भरती लेखी परीक्षे संबंधी महत्वपूर्ण लेख, पोष्ट आम्ही आपल्या वेबसाईट वर नेहमी अपडेट करत राहू. त्यामुळे वेबसाईटला नेहमी भेट देत राहा. त्याचप्रमाणे पोलीस भरतीचे अपडेट पोलीस विभागाच्या www.mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईट वर सुद्धा पाहता येतील.
4 thoughts on “Police Bharti Written Exam Syllabus | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षा अभ्यासक्रम ”