Police Bharti Practice Paper Reasoning -1। पोलिस भरती सराव पेपर बुद्धिमत्ता चाचणी

Police Bharti Practice Paper Reasoning -1। पोलिस भरती सराव पेपर बुद्धिमत्ता चाचणी

पोलीस भरती लेखी परीक्षेत इतर विषयासह बुद्धिमत्ता चाचणी हा घटक सुद्धा खूप महत्वपूर्ण घटक आहे. यातील घटकांचा योग्य अभ्यास व सर्व करून या घटकावर प्रभुत्व मिळविल्या जावू शकते. पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने या घटकावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी बोअरिंग घटक म्ह्णून याकडे दुर्लक्ष करतात. पण यातील बेसिक मुद्द्यांवर अभ्यास केला आणि काही त्यातील काही फॉर्मुला लक्षात ठेवल्यास पैकी पेक्षा पैकी मार्क मिळू शकतात.

Police Bharti Practice Paper Reasoning
विषय Subject  प्रश्न Question  गुण Marks 
बुद्धिमत्ता चाचणी Reasoning २५ प्रश्न 25 Question२५ मार्क्स 25 marks
Police Bharti Written Exam Reasoning Subject

Police Bharti Practice Paper Reasoning मध्ये २५ प्रश्नांचा सराव पेपर ( Practice Paper ) असेल. दिलेल्या Quiz मध्ये स्वतःचे नाव, मोबाइलला क्रमांक व Email योग्य व अचूक भरा. २५ प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल लगेचच पाहता येणार आहे, तसेच सविस्तर निकाल दिलेल्या ई-मेल वर सुद्धा पाठविल्या जाईल. तर हा सराव पेपर नक्की सोडवा.

Police Bharti Practice Paper Reasoning -1। पोलिस भरती सराव पेपर बुद्धिमत्ता चाचणी
106

Reasoning Quiz

Practice Paper Reasoning

पोलीस भरती बुद्धिमत्ता चाचणी - Reasoning Practice Paper -1 सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 25

Category: Reasoning

1) BDF: NPR:: HJL:?

2 / 25

Category: Reasoning

2) जर कॉबडी ला बोकड म्हटले, बोकडाला मोर म्हटले, मोराला बेडूक म्हटले, बेडकाला वाघ म्हटले, वाघाला कुत्रा म्हटले तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

3 / 25

Category: Reasoning

3) उन्हात वाळू घातलेले दहा पापड वाळायला वीस मिनिटे लागत असतील, तर त्याच उन्हात एक पापड किती वेळात वाळेल ?

4 / 25

Category: Reasoning

4) एका रांगेत सहा मुले उभी आहेत. फ हा ड आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. ब हा क आणि अ यांच्यामध्ये उभा आहे. इ हा ड च्या शेजारी उजव्या बाजूला उभा आहे. क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूला आहे तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे ?

5 / 25

Category: Reasoning

5) वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे, वासंती सुनंदा पेक्षा मोठी पण परंतु वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण ?

6 / 25

Category: Reasoning

6) राजूला एका परीक्षेत गणितात भूगोलातील गुणांच्या दुप्पट गुण मिळाले. इतिहासात भूगोलाच्या निम्मे गुण मिळाले. मराठी व गणितातील गुण समान आहेत तर त्याला कोणत्या विषयात सर्वात कमी गुण मिळाले?

7 / 25

Category: Reasoning

7) ओरिसा : भुवनेश्वर: मणिपूर ?

8 / 25

Category: Reasoning

8)  माझ्या घडयाळात आता 09.00 वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवित आहे तर मिनिटकाट्याची विरुद्ध दिशा कोणती ?

9 / 25

Category: Reasoning

9) एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली "हि माझ्या नणंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे." तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे ?

10 / 25

Category: Reasoning

10) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

11 / 25

Category: Reasoning

11) अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल दिपक व अनिलच्या मध्ये महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्या मध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दिपक कोणाच्या मध्ये आहे ?

12 / 25

Category: Reasoning

12)  एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा होता. तो सरळ थोडे अंतर चालला व थांबला असता त्याला ध्वज स्तंभाची सावली त्याच्या उजवीकडे बरोबर 90 अंश पडलेली दिसली तर त्याचे तोड कोणत्या दिशेस होते ?

13 / 25

Category: Reasoning

13) 100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात, 40 मुले कॉफी पितात आणि 25 पंचवीस मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात. तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत ?

14 / 25

Category: Reasoning

14)  दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर उजवा हात कोणत्या दिशेस आहे ?

15 / 25

Category: Reasoning

15) एक नाटक 9:40 ला सुरु झाले आणि 12:15 ला संपले. तर ते नाटक किती तास चालले ?

16 / 25

Category: Reasoning

16) जर राम श्यामपेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गितापेक्षा 1 वर्षांनी छोटा असेल. गिता सितापेक्षा 1 वर्षांनी लहान असेल व सिताचे वय 10 वर्ष असेल तर रामचे वय किती ?

17 / 25

Category: Reasoning

17) एका सांकेतिक भाषेत 3 = N, 5= C, 7 = E, 9 = A, 11 = R, 13 = Y, NEAR = किती ?

18 / 25

Category: Reasoning

18) खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे ?

19 / 25

Category: Reasoning

19) 0, 6, 24, 60, 120, 210, ?

20 / 25

Category: Reasoning

20) एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार आला असेल ?

21 / 25

Category: Reasoning

21) एका शेतामध्ये पाच कोंबड्या, दोन डझन बदके व दहा गाई आहेत. तर त्या शेतामधील या कोंबड्या, बदके व गाई यांच्या डोके व पाय यांची बेरीज किती ?

22 / 25

Category: Reasoning

22) जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरण्याला पांढरा म्हटले पांढन्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता ?

23 / 25

Category: Reasoning

23) 1 जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्याच वर्षी चार फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल ?

24 / 25

Category: Reasoning

24) एका सांकेतिक भाषेत GIVE म्हणजे VIEG तर DISK = ?

25 / 25

Category: Reasoning

25)  नरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो. परत उजवीकडे वळतो. नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे ?

Your score is

Police Bharti Practice Paper Reasoning मध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. वेण आकृती, क्रमवार संख्या संच, वेगळी आकृती, संख्या ओळखणे, कालमापन, रांगेवर आधारित प्रश्न, वेगळे पद ओळखणे, सांकेतिक भाषा, आरसातील आकृती, पाण्यातील प्रतिबिंब, दिशा आणि अंतर, घडाळ्यावर प्रश्न, नाते सबंध, ई..

पोलीस भरती प्रक्रिया सविस्तर माहिती साठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची पोलिस भरती साठी पोलीस विभागाने विशेष सुरू केलेल्या https://policerecruitment2022.mahait.org या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. 

Leave a Comment