Police Bharti Practice paper Mathematics -1। पोलिस भरती सराव पेपर गणित।

Police Bharti Practice paper Mathematics -1। पोलिस भरती सराव पेपर गणित

पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान याबरोबरच गणित हा विषय सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. १०० मार्क्सच्या एकूण पेपर पैकी २५ मार्कचे २५ प्रश्न हे गणित या विषयावर आधारित असतात. मराठी आणि सामान्य ज्ञान याप्रमाणेच गणित हा सुद्धा मार्क मिळवून देणारा विषय आहे.

Police Bharti Practice paper Mathematics Marks
विषय Subject  प्रश्न Question  गुण Marks 
गणित Mathematics २५ प्रश्न 25 Question२५ मार्क्स 25 marks
Police Bharti Written Exam Mathematics Subject

आज आपण गणित याच विषयावर २५ प्रश्नांचा सर्व पेपर ( Practice Paper ) पाहणार आहोत. खाली दिलेल्या Quiz मध्ये स्वतःचे नाव, मोबाइलला क्रमांक व Email योग्य व अचूक भरा. २५ प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल लगेचच पाहता येणार आहे, तसेच सविस्तर निकाल दिलेल्या ई-मेल वर सुद्धा पाठविल्या जाईल. तर हा सर्व सराव पेपर नक्की सोडवा.

Police Bharti Practice paper Mathematics -1। पोलिस भरती सराव पेपर गणित।
133

Mathematic Quiz

Practice Paper Mathematics-1

Police Bharti Practice Paper Mathematics-1- पोलिस भरती सराव पेपर गणित सोडविण्यासाठी Start वर Click करा.

1 / 25

Category: Mathematic

1) एका चित्रपटांमध्ये लहान मुलांसाठी तीन रुपये व प्रौढ वर्गासाठी दहा रुपये तिकीट आहे. या चित्रपटाला पंचवीस लोकांनी तिकिटे काढली. त्यावेळी त्यांना 180 रुपये खर्च करावे लागले तर त्या 25 लोकांपैकी लहान मुलांची संख्या किती?

2 / 25

Category: Mathematic

2) 1 + 2 + 3 + 4+ 196 + 197 + 198 + 199 = ? 

3 / 25

Category: Mathematic

3)  मालिका पूर्ण करा. 13, 26, 78, 312, 1560, ?

4 / 25

Category: Mathematic

4) (12 × 5 + 24 ÷ 6-3 ) = ?

5 / 25

Category: Mathematic

5)  एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णाची लांबी अनुक्रमे 11.2 सेंटीमीटर व 7.5 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा ? 

6 / 25

Category: Mathematic

6) पहिल्या राशीचे दुसन्या राशीशी गुणोत्तर काढा. 2.4 किलोग्रॅम,  3600 ग्रॅम

7 / 25

Category: Mathematic

7) 41 + 4.11 + 0:41 + 411 + 41.41 = ?

8 / 25

Category: Mathematic

8) 362, 117 व 244 या संख्यांची सरासरी किती?

9 / 25

Category: Mathematic

9) एका शेअरचा बाजार भाव रुपये 1000 असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1 % दलाली दिली तर शेअर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती?

10 / 25

Category: Mathematic

10) गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, 25% टक्के रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते, 20% रक्कम घरभाडे, 20% रक्कम गावी आई वडिलांसाठी अशाप्रकारे खर्च करतो. एवढे करूनही तो उरलेली रक्कम रुपये 5,000 बचत करतो. तर त्याचे मासिक उत्पन्न किती ? 

11 / 25

Category: Mathematic

11) मालिका पूर्ण करा.  9, 10, 13, 18, 25, ? 

12 / 25

Category: Mathematic

12)  दिलेल्या संख्या मालिकेत X = ? 7, X,21,31,43

13 / 25

Category: Mathematic

13) 20 किलो भोपळ्यापैकी काही भोपळे 15 रुपये प्रति किलो व उरलेले भोपळे 20 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकले. विक्रीतून एकूण 340 रुपये मिळाले तर 15 रुपये प्रति किलो या दराने किती किलो भोपळे विकले ?

14 / 25

Category: Mathematic

14) 69 x 25 + 25 x 31 = ?

15 / 25

Category: Mathematic

15) 0.47x5.3 X 0.06 = ?

16 / 25

Category: Mathematic

16) मालिका पूर्ण करा. 3, 6, 12, 24, 48, ?

17 / 25

Category: Mathematic

17)  कल्लप्पा जवळ 2470 आंबे होते. त्याने एका पेटीत तीन डझन आंबे ठेवून अशा पंचवीस पेट्या विकल्या. उरलेल्या आंब्या पैकी 56 आंबे खराब निघाले त्याने ते टाकून दिले तर त्याच्याकडे किती आंबे उरले आहे?

18 / 25

Category: Mathematic

18) रुपये 7000 या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्षे लागतील ?

19 / 25

Category: Mathematic

19) एका गवाची लोकसंख्या चार हजार आहे. ती दरवर्षी दहा टक्के वाढते. तर दोन वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल ?

20 / 25

Category: Mathematic

20) चार संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती?

21 / 25

Category: Mathematic

21) x + y = 21, x - y = 1, तर 4x + 4y = ?

22 / 25

Category: Mathematic

22) एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत. तर एकूण रांगा किती होतील?

23 / 25

Category: Mathematic

23) एका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात, 8 मुले हॉकी खेळतात. दोन्ही खळ न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे. तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची संख्या किती ?

24 / 25

Category: Mathematic

24) खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

25 / 25

Category: Mathematic

25) खालीलपैकी कोणत्या संख्येस तीन ने निःशेष निश्चित भाग जातो ?

Your score is

पोलीस भरती पेपर मद्ध्ये गणित या विषयातील पुढीलप्रमाणे पुढीलप्रमाणे असतात. संख्या व संख्येचे प्रकार, बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूलम, शेकडेवारी, कसोट्या, मसावि आणि लसावि, पूर्णांक व अपूर्णांक, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, दशमान पद्धत, नफा तोटा, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, घड्याळ्यांवर आधारित प्रश्न, घातांक व घाटांकाचें नियम इ. यावर विशेष भर असतो. साधारणतः वर्ग ५ वि ते वर्ग १० वि च्या क्रमिक पुस्तकातून गणित या विषयाचा चांगला अभ्यास होऊ शकतो.

पोलीस भरती प्रक्रिया सविस्तर माहिती साठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची पोलिस भरती साठी पोलीस विभागाने विशेष सुरू केलेल्या https://policerecruitment2022.mahait.org या वेबसाईट ला अवश्य भेट द्या. 

Leave a Comment