Police Bharti Marathi Grammar Part of Speech मराठी व्याकरण – शब्दाच्या 8 जाती.

शब्दांच्या जाती– Marathi Grammar Part of Speech
शब्दाच्या एकूण आठ जाती आहेत. Marathi Grammar Part of Speech. त्या दोन प्रकारात विभाजित केल्या जातात. १) विकारी- यामध्यें नाम, सर्वनाम, police bharti marathi vyakaran

विशेषण, क्रियापद असा ४ जाती येतात. २) अविकारी – यामध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय असा ४जाती येतात. त्या आपल्याला खालील आकृतीवरून चांगल्या प्रकारे समजतील. 

Marathi Grammar part of speech
शब्दच्या जाती Marathi Grammar Part of Speech
1) नाम (Noun)

खऱ्या किंवा कल्पिक गोष्टीची अथवा त्यांच्या गुणांची नावे दर्शविणे विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. 

उदाहरणार्थ – गोपाळ, मुलगा, सौंदर्य, आंबा, फुले, गाय, इत्यादी.

नामांचे प्रकार

नामाचे प्रकार – Types Of noun

नामांचे एकूण ३ प्रकार आहेत १)सामान्य नाम, २)विशेष नाम, ३)भाववाचक नाम Marathi Grammar Part of Speech

सामान्य नाम

एकाच जातीच्या अनेक वस्तूंना लागू पडणाऱ्या नामास  सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ- माणूस, प्राणी, गवत, झाड, गाय, पर्वत, नदी, घर, इत्यादी.  

विशेषनाम 

ज्या नामाने एकाच जातीच्या अनेक वस्तूंपैकी एकाच विशिष्ट वस्तूंचा बोध होतो अशा नामास विशेषनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ- गोपाळ, काळी कपिला गाय, सह्याद्री, गंगा, पुणे, इत्यादी.  

भाववाचक नाम

ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांमधील गुणांचा, धर्मांचा वा भावाचा बोध होतो, त्या नामास भाववाचकनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ- शौर्य, धैर्य, वात्सल्य, स्वामित्व, दास्य, इत्यादी. 

सामान्य नामांना व विशेषणांना ई, य, त्व, पणा, ता, गिरी, की, वा, आई असे प्रत्यय लागूनही भाववाचक नामे तयार होतात. उदाहरणार्थ- मधु- माधुरी, देव-देवत्व, मोठा-मोठेपणा, गुंड-गुंडगिरी, वकील-वकिली, दास-दास्य, इत्यादी. 

याशिवाय हस, खेळ, कर, वाग, दे यासारख्या धातूंनाही णे, उ,अ, ण  हे प्रत्यय लावून हसणे, खेळणे, डरणे, वागणे, देणे, धावणे, पोहणे, वाचणे यासारखी धातूसाधित नाम तयार होतात. Marathi Grammar Part of Speech

2) सर्वनाम (Pronoun)

नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दात सर्वनाम असे म्हणतात. 

उदाहरणार्थ तो, तू, मी, ते, हा, ही, जो, जे, कोण, इत्यादी. 

प्रश्नार्थक सर्वनाम -कोण, कोणाला, कोणी, कोणास, काय, इत्यादी. 

संबंधी सर्वनाम- जो, जी, जे, जा. 

दर्शक सर्वनाम तो, ती, ते, त्या, / ही, ही, हे, ह्या. 

3) विशेषण (Adjective)

जे शब्द नामांबद्दल विशेष माहिती देतात व त्यांची  व्याप्ती मर्यादित करतात, त्यांना विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ- हुशार, मूर्ख, भित्रा, काळा, तिखट, गोड, दोन, इत्यादी. 

विशेषणांचे प्रकार 

विशेषणांचे ३ प्रकार आहेत आहेत,  ते पुढीलप्रमाणे.  १)गुणविशेषण, २)संख्या विशेषण, ३)सर्वनामिक विशेषण. 

विशेषणांचे प्रकार – Types of Adjective-

गुणविशेषण

ज्या विशेषनाने नामाचा एखादा गुण दाखविला जातो व नामाची व्याप्ती मर्यादित केली जाते. त्या विशेषणास गुणविशेषण असे म्हटले जाते. उदाहरणार्थ चांगला मुलगा, श्रीमंत व्यक्ती, धीट मुलगी, शूर सैनिक.

संख्या विशेषण

नामाची संख्या दर्शवणाऱ्या विशेषणाच संख्या विशेषण असे म्हणतात.  उदाहरणार्थ चार मुले, खूप माणसे, दहा रुपये, काही मुली, बारा बलुतेदार, चौसष्ट कला, इत्यादी.

संख्या विशेषणाचे प्रकार

  • गणना वाचक- दहा, वीस, पन्नास हजार, इत्यादी
  •  कर्मवाचक- पहिला, दुसरा, दहावा, किंवा प्रथमा, द्वितीया, सप्तमी, इत्यादी
  • आवृत्तीवाचक- दुप्पट, चौपट, दसपट, इत्यादी
  • पृथकत्ववाचक- दोन-दोन, पाच-पाच, दहा-दहा, इत्यादी
  • अनिश्चित संख्यावाचक- अल्प, अत्यल्प, एकंदरीत, खूप, बरेच, काही, इत्यादी

Marathi Grammar Part of Speech

सर्वनामिक विशेषण

जेव्हा सर्वनामांचा उपयोग विशेषनाप्रमाणे होतो तेव्हा त्यांना सर्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ- तो मुलगा, त्याची वही, असली पुस्तके, कोण मनुष्य ? तिचा पेन, कसली गडबडी, इत्यादी. 

  • नामसाधित विशेषण- फळ-विक्रेता, कापड-बाजार, साखर- भात, इत्यादी.
  • धातूसाधित विशेषण- रडका मुलगा, चालती गाडी, खेळता पैसा, बोलकी बाहुली, इत्यादी.  
  • अव्ययसाधित विशेषत- पुढील मैदान, मागील बगीचा, वरचा मजला, पुढील चौक, इत्यादी. 
4) क्रियापद (Verb)

वाक्यातील क्रिया स्पष्ट करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दास क्रियापद असे म्हणतात. 

उदाहरणार्थ- आहे, होता, गेला, आला, येतो, करतो, खातो, वाचतो, इत्यादी.

क्रियापदाचे प्रकार

क्रियापदाचे प्रकार- Types of Verb

A )सकर्मक क्रियापदे– 

 ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते, अशा क्रियापदा सकर्मक क्रियापद असे म्हणतात.  उदाहरणार्थ- तो आंबा खातो, तो पुस्तक वाचतो, इत्यादी.

B) अकर्मक क्रियापदे- 

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरूर नसते, अशा क्रियापदांना अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ – तो पडला, रमेश हसतो, मी पाहतो, इत्यादी.

अ) संयुक्त क्रियापदे-

क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्यात मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाच्या रूपाला जोडून जे दुसरे क्रियापदे येते त्यास सहायक क्रियापद असे म्हणतात. तर मुख्य क्रियापद क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाचे रूप व सहाय्यक क्रियापद या दोघांना मिळून संयुक्त क्रियापद असे म्हणतात.  उदाहरणार्थ- मी खात आहे, तो पळत आहे, मुले खेळत होती.

ब) प्रयोजक क्रियापदे– (दुसऱ्याकडून करून  घेणे)

जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करवितो, तेव्हा ती क्रिया दर्शवणाऱ्या क्रियापदास प्रायोजक क्रियापदे असे म्हणतात. उदाहरणार्थ- सुनीता बाळाला खेळवते, आई मुलाला निजवते, कविताने बाळाला रडविले. 

क) शक्य क्रियापद-

जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कार्याच्या संदर्भात शक्यता अथवा सामर्थ्यांचा बोध होतो, तेव्हा त्या शक्य क्रियापद असे म्हणतात.  उदाहरणार्थ- मला आता बसवते, त्याला आता उभे राहवते, रामूला दिवसा सूर्याकडे पाहवते

क्रियापदाचे काळ

मुख्य काळ

  1. वर्तमानकाळ- मी चित्रपट पाहतो.
  2. भूतकाळ- मी चित्रपट पाहिला.
  3. भविष्यकाळ- मी चित्रपट पाहिन

काळाचे उपप्रकार

क्रियापदाचे काळ आणि त्याची उदाहरण –

क्रियापदांचे अर्थ

  1. स्वार्थी क्रियापदे– (मूळ अर्थ, काळाचाच बोध)

या ठिकाणी क्रियापदापासून त्या क्रियापदाचा स्वतःचा असा किंवा मूळ अर्थच प्रगट होतो. या प्रकारच्या क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो. Marathi Grammar Part of Speech

उदाहरणार्थ-गुरुजी खुर्चीवर बसले, मी चित्रपट पाहिला. मुले सहलीला गेली.

  1. आज्ञार्थी क्रियापद– (आज्ञा, अनुज्ञा, विनंती, प्रार्थना) 

ज्यावेळी क्रियापदांचा रूपावरून आज्ञा देणे, अनुज्ञा मागणे, विनंती मागणे अथवा प्रार्थना करणे या बाबींचा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदास  आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात.  

उदाहरणार्थ-

  1. सर्वांनी हात वर करा,(आज्ञा) 
  2. जरा इकडे ये बरं ! (सौम्य आज्ञा)
  3. परमेश्वरांना, यांना सद्बुद्धी दे . (प्रार्थना) 
  4. मी आता जाऊ का ? (अनुज्ञा मागणे)
  5. मला थोडी मदत करशील का ? (विनंती)
  1. विद्यार्थी क्रियापदे– (शक्य, शक्यता, कर्तव्य, इच्छा, अशा)

जेव्हा क्रियापदावरून शक्य-शक्यता, कर्तव्य, इच्छा, आशा, इत्यादी बाबींचा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदांना विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात. 

उदाहरणार्थ-

  1. नेहमी खरे बोलावे.(कर्तव्य)
  2. तू तुझ्या कार्यात यशस्वी होवो. (इच्छा)
  3. बहुदा संध्याकाळी तो घरी असेल. (तर्क)
  4. बापूची भूमिका करावी ती काशिनाथनेच ! (योग्यता) 
  1. संकेतार्थ क्रियापदे– (अटी संकेत)

जेव्हा क्रियापदावरून काही अटींचा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदास संकेतार्थी क्रियापद म्हणतात.

उदाहरण-

  1. त्यांने जर अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता. 
  2. मला जर आज दहा रुपये मिळाले असते तर मी नक्कीच नाटकाला गेलो असतो.
5) क्रियाविशेषण (Adverb)

क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्द क्रियाविशेषण असे म्हणतात.  उदाहरणार्थ- येथे, येथे, आज, काल, नंतर, अगोदर, मागे, पुढे, खूप, इत्यादी. आपण या लेखात पाहत आहोत Marathi Grammar Part of Speech.

१} स्थल वाचक क्रियाविशेषण-

  • जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.
  • पलीकडे विहीर आहे. 
  • घोडा समोरून धावत आला.

२) काल वाचक क्रियाविशेषण-

  • दुपारी लोक विश्रांती घेतात.
  • चार वाजता पाहुणे आले.
  • आज सर्वजण लवकर उठतील.

३) शब्दयोगी क्रियाविशेषण-

  • कौलावर मांजर अडकले.
  • शत्रूविरुद्ध आपण प्राण पणाला लावून लढतो.
  • विवाहप्रित्यर्थ सर्वजण जमले आहेत.
6) शब्दयोगी अव्यय (Preposition)– (नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणारे)

नामांना किंवा सर्वनामंना जोडून येणाऱ्या आणि वाक्यात इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दार्थ शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ, वडाखाली, घरासमोर, शाळेपर्यंत, रस्त्यावर, कामासाठी या जोड शब्दांमध्ये नामांचा किंवा सर्वनामांना जोडून आलेले खाली, समोर, पर्यंत, वर, साठी हे शब्द. Marathi Grammar Part of Speech

7) उभयान्वयी अव्यय (Conjunction)– (शब्द किंवा वाक्यांना जोडणारा)

दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ- आणि, व, किंवा, परंतु, म्हणून, इत्यादी. 

प्रधानत्व सुचक उभयान्वयी अव्यय- आणि, व, नि, किंवा, अथवा, पण, तरी, परंतु, म्हणून(परिणाम बोधक), सबब.इ.

गौणत्व सुचक उभयान्वयी अव्यय-  कारण, की, म्हणून, सबब(००उद्देश बोधक) जेव्हा, तेव्हा, इ.

8) केवलप्रयोगी अव्यय (Interjection)- (भावना, आनंद, दुःख, आचार्य) 

जे शब्द आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य, यासारख्या भावना वा अन्य विचार व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ- वाहवा, शाब्बास, अरेरे, ओय ओय, अरे बापरे इत्यादी.

या लेखात आपण Marathi Grammar Part of Speech म्हणजेच शब्दाच्या जाती पहिल्या. त्यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय या विषयी सविस्तर माहिती घेतली. आपल्याला हि माहिती कशी वाटली नक्की कंमेंट करा. लेटेस्ट माहिती आणि उपडेट साठी आमचे Telegram चॅनेल नक्की जॉईन करा.

Leave a Comment