Maharashtra Police Bharti 2022 Physical Test Pattern – महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ शारीरिक चाचणी
देशसेवेची आवड असणाऱ्या आणि डोळ्यात पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या हजारो युवकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस भरती संकेत दिले आहेत. त्यासंबंधी जिल्हानिहाय रिक्त जागांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ती आपण येथे क्लिक करून पाहू शकता. त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांनी Police Bharti संबंधी पूर्वतयारी सुरू करायला हवी. आपण या लेखातून ही भरती प्रक्रिया कशी असेल, यात कोणते टप्पे असतील याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रात दरवर्षी हजारो युवक विविध परीक्षांचे तयारी करीत असताता. परंतु बऱ्याच वेळा मार्गदर्शनाचा व माहितीचा अभाव यामुळे त्यांना योग्य दिशा मिळत नाही. हीच लक्षात गोष्ट लक्षात घेऊन mahapolicebharati.com निर्मिती केली आहे. https://mahapolicebharati.com चा उद्देश प्रत्येक तयारी करणाऱ्या पर्यंत योग्य व अचूक माहिती पोहोचवणे आहे, त्यामुळे परीक्षेसंबंधी प्रत्येक गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पोलीस भरती साठी पोलीस विभागाची अधिकृत वेबसाइट www.mahapolice.gov.in नक्की बघा.
महाराष्ट्रात लवकरच 14 हजार 956 पोलीस भरती ( Police Bharti ) होणार आहेत. तर या संबंधी संपूर्ण माहिती प्रक्रिया आणि सराव प्रश्नसंच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूयात पोलीस भरती प्रक्रिया कशी असणार आहे. यामध्ये शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा असे परीक्षेचे स्वरूप असणार आहे.
हेही वाचा… महाराष्ट्र पोलीसात १८३३१ भरती सविस्तर प्रक्रिया…
Maharashtra Police Bharti Physical Criteria – महाराष्ट्र पोलीस भरती आवश्यक शारीरिक क्षमता
पोलीस भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराजवळ खालील शारीरिक क्षमता आसने आवश्यक आहे.
Parameters – मापदंड | Male – पुरुष | महिला |
Height – उंची | 165 cm | 158 cm |
Chest – छाती | 79 cm (not Less than) | NA – लागू नाही |
Maharashtra Police Bharti 2022- पोलीस भरती प्रक्रिया
- पोलीस शिपाई या पदासाठी उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल.
- शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र असतील.
- रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणं अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती Provisional selection) असेल.
- शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
- अंतिम गुणवत्ता यादी वरून उमेदवाराची निवड होणार असून त्याला पोलीस शिपाई म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
Physical Test (शारीरिक चाचणी परीक्षा ) – 50 Marks (गुण)
Written Exam (लेखी परीक्षा ) – 100 Marks (गुण)
Minimum Marks Obtained – Physical Test- 50 % -Written Exam – 40%
Maharashtra Police Bharti 2022 प्रक्रिया
Physical Test – शारीरिक चाचणी | 50 Marks (गुण) |
Passing marks for Physical – शारीरिक चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण | Minimum 50 % |
Written Exam – लेखी परीक्षा | 100 Marks (गुण) |
Passing marks for Police Bharti written exam – लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण | 40 % |
Maharashtra Police Bharti 2022 प्रक्रिया
Maharashtra Police Bharti Physical Test Contained – पोलीस भरती शारीरिक चाचणी
पोलिस भरती शारीरिक चाचणी हि वरील सांगितल्या प्रमाणे ५० गुणांची असेल त्यामध्ये खालील चाचणीचा समावेश असेल.
पुरुषांसाठी
Physical Test for Male शारीरिक चाचणी ( पुरुष) | |
---|---|
1600 meters running – 1600 मीटर धावणे | 20 Marks |
100 meters running – 100 मीटर धावणे | 15 Marks |
Shot Put – गोळा फेक | 15 Marks |
Total Marks- एकूण मार्क्स | 50 Marks |
महिलांसाठी
Physical Test for Female शारीरिक चाचणी ( महिला ) | |
---|---|
800 meters running – 800 मीटर धावणे | 20 Marks |
100 meters running – 100 मीटर धावणे | 15 Marks |
Shot Put (4 Kg) – गोळा फेक (4 किलो) | 15 Marks |
Total Marks- एकूण मार्क्स | 50 Marks |
अशाप्रकारे शारीरिक चाचणीचे स्वरूप असणार आहे (Police Bharti Physical Test Pattern). या शारीरिक चाचणीमध्ये कमीत कमी ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदरांना लेखी परीक्षेत प्रवेश मिळणार आहे. लेखी परीक्षेविषयी सविस्तर आपण पुढील लेखात पाहणार आहोत.
महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम
6 thoughts on “Maharashtra Police Bharti 2022 Physical Test Pattern – महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ शारीरिक चाचणी ”