Maharashtra Police Bharti 2022 – बहुप्रतीक्षित असणारी पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. जवळपास वीस हजार पोलिसांची पदे यामधून भरण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांनी सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असणार्या पदांची जिल्हा निहाय व आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईसह राज्यभरात १८ हजार ३३१ पोलीस शिपाई. पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई यांची पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये यातील १८३३१ रिक्त पोलीस शिपाई (Police Shipai) पदासाठी निवड प्रक्रिया दिनांक ०९ नोव्हेंबर पासून सुरु झाली आहे.
यासंबंधीची सविस्तर जिल्हानिहाय जाहिरात ८ नोव्हेंबर २०२२ ला वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये पोलीस शिपाई सोबतच पोलीस शिपाई चालक व राज्य राखीव बल सशस्त्र पोलीस शिपाई यांची सुद्धा भरती या प्रक्रियेतून केली जाणार आहे. या लेखातून हि निवड प्रक्रिया कशी असणार हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
सदर Maharashtra Police Bharti २०२२ अर्ज स्वीकृती प्रक्रिया हि ऑनलाईन स्वरूपाची राहणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारास ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment 2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात सविस्तरपणे जरूर वाचावी.
महाराष्ट्र पोलीस भरतीचा अर्ज ओंनलाईन पद्धतीने असा सादर करावा
Maharashtra Police Bharti २०२२ प्रक्रिया
Post Name (पदाचे नाव) | पोलीस शिपाई/ पोलीस शिपाई चालक/ सशस्र पोलीस शिपाई |
Advertisement Date (जाहिरात प्रसिद्धी दिनांक) | ८ नोव्हेंबर २०२२ |
Application Start Date (अर्ज सुरु होण्याची दिनांक) | ९ नोव्हेंबर २०२२ |
Last Date of Application (अर्जाची शेवटची दिनांक) | ३० नोव्हेंबर २०२२ |
Application Method (अर्ज करण्याची पद्धत) | Online (ऑनलाईन) |
Online Application Website (अर्जासाठी वेबसाइट) | policerecruitment 2022.mahait.org |
Eligibility (पात्रता) | 12th (बारावी किंवा समकक्ष ) |
Age Limit (वयोमर्यादा) | १८ ते ३३ (प्रवर्गनिहाय साठी जाहिरात पाहावी) |
Total Recruitment (एकूण रिक्त जागा) | १८३३१ जागा |
Admit Card Date (प्रवेशपत्र दिनांक) | – |
Physical Test Date (शारीरिक चाचणी दिनांक) | – |
Written Exam Date (लेखी परीक्षा दिनांक) | – |
Result Date (निकाल दिनांक) | – |
Maharashtra Police Bharti Important instruction. अर्जदारास महत्वपूर्ण सूचना
- उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही.
- उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
- पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेला उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर होणारी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल, त्यासाठी अर्जदाराने ऑनलाइन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
- भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणं अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती Provisional selection) असेल. निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
- पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाची ,परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment 2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध होतील. जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. तसेच सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध सदरहू पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांचाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
- उमेदवारांनी संकेतस्थळावर जावून आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवारी अर्ज करू शकणार नाहीत.
Maharashtra Police Bharti – District wise Maharashtra Police Constable Recruitment Vacancy List – जिल्हा / शहर निहाय महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती रिक्त पदाची यादी
जिल्हा /शहर | रिक्त पदे | जिल्हा /शहर | रिक्त पदे |
मुंबई | ७०७६ | पुणे ग्रामीण | ५७९ |
ठाणे शहर | ५२१ | सातारा | १४५ |
पुणे शहर | ७२० | सोलापूर ग्रामीण | २६ |
पिंपरी चिंचवड | २१६ | औरंगाबाद ग्रामीण | ३९ |
मीरा भाईंदर | ९८६ | नांदेड | १५५ |
नागपूर शहर | ३०८ | परभणी | ७५ |
नवी मुंबई | २०४ | हिंगोली | २१ |
अमरावती शहर | २० | नागपूर ग्रामीण | १३२ |
सोलापूर शहर | ९८ | भंडारा | ६१ |
लोहमार्ग मुंबई | ६२० | चंद्रपूर | १९४ |
ठाणे ग्रामीण | ६८ | वर्धा | ९० |
रायगड | २७२ | गगडचिरोली | ३४८ |
पालघर | २११ | गोंदीया | १७२ |
सिंधुदुर्ग | ९९ | अमरावती ग्रामीण | १५६ |
रत्नागिरी | १३१ | बुलढाणा | ५१ |
नाशिक ग्रामीण | १६४ | अकोला | ३२७ |
अहमदनगर | १२९ | यवतमाळ | २४४ |
धुळे | ४२ | लोहमार्ग पुणे | १२४ |
कोल्हापूर | २४ | लोहमार्ग औरंगाबाद | १५४ |
एकूण रिक्त जागा =१४९५६ |
Maharashtra Police Bharti – District wise Police Constable Driver Recruitment Vacancy List – जिल्हा / शहर निहाय महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरती रिक्त पदाची यादी
Maharashtra Police Bharti– याप्रमाणेच राज्य राखीव बल सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या सुद्धा १२०१ रिक्त जागा या पोलीस भरती मधून भरल्या जाणार आहे त्या सविस्तर जागा पुढीलप्रमाणे असणार आहेत.
2 thoughts on “Maharashtra Police Bharti 2022 Huge Requirements – महाराष्ट्र पोलीसात १८३३१ भरती प्रक्रिया”