हा लेखात आपण सामान्य विज्ञान या विषयातील Essential elements for the human body : Carbohydrates, Proteins, Vitamin and Minerals म्हणजेच मानवी शरीरासाठी आवश्यक घटक : कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे व खनिजे हा घटक पाहणार आहे.
प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सामान्य विज्ञान हा घटक असतोच, अगदी MPSC च्या परीक्षा, जिल्हा परिषद भरती परीक्षा, PSI परीक्षा, तलाठी भरती, पोलीस भरती परीक्षा या सर्व परीक्षांत सुद्धा सामान्य विज्ञान General Science हा घटक खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आपण हा लेखापासून सुरुवात करूया. यातील एक एक मुद्द्यांवर सविस्तर लेखमाला सुरु करतोय. या लेखात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे व खनिजे या वर सविस्तर पाहूया
पिष्टमय पदार्थ, शर्करा, तंतुमय पदार्थ आणि कर्बोदके – Starchy Foods, Sugar, Fiber and Carbohydrates
पिष्टमय पदार्थ– Starchy Foods – मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थाला पिष्टमय पदार्थ म्हणतात. पिष्टमय पदार्थामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, इ, तृणधान्य, साबुदाणा, बटाटा हे पिष्टमय पदार्थांचा मुख्य स्रोत आहेत.
शर्करा- Sugar – वनस्पती पासून मिळणारे आणि चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय. साखर, सुक्रोज हे शर्करा चे मुख्य स्रोत आहेत. यामधून शरीराला ऊर्जा मिळते.
तंतुमय पदार्थ- Fibrous Foods – पचन प्रक्रिया सुरळीत करणारे पदार्थ म्हणजे तंतुमय पदार्थ होत. खाल्लेले अन्न अन्नमार्गातून पुढे पुढे सरकवून विष्ठा तयार करण्यासाठी मदत करण्यासाठी तंतुमय पदार्थ कार्य करतात. फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा, साली, हिरव्या पालेभाज्या, कोंडा, धान्ये, मोड आलेले कडधान्ये, चोथा असणारे पदार्थ हे तंतुमय पदार्थांचे मुख्य स्रोत आहेत. तंतुमय पदार्थांच्या अभावामुळे बद्धकोष्ठतेचा ( Constipation) त्रास होतो.
कर्बोदके- Carbohydrates – पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात. शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळवून देण्याचे कार्य कर्बोदके करतात.
Essential elements for the human body : Carbohydrates, Proteins, Vitamin and Minerals
स्निग्ध पदार्थ – तेल, तूप, साय, लोणी, मांस, अंड्याचे बालक हे स्निग्ध पदार्थ होत. या घटकांचे दोन प्रकारचे कार्य असते, एक म्हणजे शरीराला ऊर्जा पुरवणे आणि दुसरे म्हणजे शरीरातील काही कार्यात आवश्यक घटक म्हणून भूमिका बजावणे. उदा. शरीरातील सांध्यामध्ये द्रव म्हणून काम करणे, त्यामुळे सांध्यांचे घर्षण होत नाही. यातून निर्माण होणाऱ्या चरबीतून पिष्टमय पदार्थामधून मिळणाऱ्या उर्जेच्यास दुप्पट ऊर्जा मिळते.
प्रथिने- Proteins – शरीराचा बांधणीसाठी गरज असणारे तसेच शरीराची झीज भरून काढणारे घटक म्हणजे प्रथिने Proteins होत. मुख्यतः कडधान्ये, दाळी, शेंगदाणे, दूध व दही, खवा, पनीर, दुधाचे पदार्थ. अंडी, मांस, मासे यांतून मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात. शरीरासाठी साधारणतः कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकत असते.
हेही वाचा…महाराष्ट्र पोलीस भरती 2022 लेखी परीक्षा अभ्यासक्रम । Police Bharti Written Exam Syllabus |
जीवनसत्वे- Vitamins – शरीरासाठी अल्प प्रमाणात पण आवश्यक असणारे घटक म्हणजे जीवनसत्वे होत. जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते.
जीवनसत्वे- जीवनसत्वाच्या अभामुळे होणारे आजार आणि उपाययोजना –
अ . क्र . | जीवनसत्वे – Vitamins | जीवनसत्वाच्या अभावामुळॆ होणारे विकार- Diseases caused by lack of vitamins | उपाययोजना- Action To Be Taken |
१ | अ – A | रातांधळेपणा | आहारात पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, दूध यांचा समावेश करणे. |
२ | ब – B | जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे, बेरीबेरी रोग होणे. | आहारात डाळी, पालेभाज्या, दूध यांचा समावेश करणे |
३ | क – C | हिरड्यातून रक्त येणे, स्कर्व्ही रोग होणे. | आहारात आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेले कडधान्ये यांचा समावेश करणे |
४ | ड – D | पायाची हाडे वाकणे , पाठीला बाक येणे. | कोवळ्या सूर्यप्रकाशात बसने,आहारात दूध, शार्क लिव्हर ऑइल आणि कॉडलिव्हर ऑइल यांचा समावेश करणे |
५ | ई – E | स्नायूंचा अशक्तपणा, वांझपणा, वारंवार गर्भपात होणे. | आहारात वनस्पती तेल, हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक यांचा समावेश करणे |
६ | के – K | रक्त न गोठणे, जखम झाल्यास रक्तस्त्राव सुरूच राहणे. | आहारातहिरव्या पालेभाज्या, गोबी, ब्रोकली, बदाम, अंजीर मांस, मासे, अंडे, दूध यांचा समावेश करणे |
खनिजे – Minerals – चांगल्या आरोग्यासाठी आहारात खनिजांचा समावेश असणे खूप महत्वपूर्ण आहे. लोह, कॅल्शिअम, सोडियम, पोटॅशिअम, फॉस्फरस हे महत्वपूर्ण खनिजे आहेत.
लोह– रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम लोह हे खनिज करत असते. लोहाचे प्रमाण कमी झाले तर, शरीराला ऑक्सिजन चा आवश्यक पुरवठा होत नाही. त्यामुळॆ अशक्तपणा व सतत थकवा जाणवतो. या विकाराला “अँनिमिया- रक्तक्षय किंवा पांडुरोग” असे म्हणतात.
कॅल्शिअम आणि फॉस्फरस यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. सोडियम आणि पोटॅशियम शरीराच्या ऊतींच्या प्रक्रिया नियंत्रित करतात. त्याचप्रमणे तांबे, कोबाल्ट, आयोडीन, फ्लोरिन, मॅंगनीज हे सुध्या अत्यल्प प्रमाणात शरीरात आढळून येत्ते.
- Maharashtra Police Bharti 2024 : 17471 पदांची महाराष्ट्र पोलिस मेगा भरती
- मराठी व्याकरण: पोलिस भरती परीक्षेसाठी यशाची गुरुकिल्ली Marathi Grammar: Key to Success in Police Bharti Exam
- Police Bharti Mathematics Practice Paper-2 पोलीस भरती गणित सराव पेपर
- Police Bharti Current Affaire Practice Paper- 1 | पोलीस भरती चालू घडामोडी सराव पेपर
- Police Bharti Marathi Grammar Practice Test -2 पोलिस भरती सराव टेस्ट 2
- Maharashtra Police Bharti 2022 Huge Requirements – महाराष्ट्र पोलीसात १८३३१ भरती प्रक्रिया
- Maharashtra Police Bharti 2022 Physical Test Pattern – महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ शारीरिक चाचणी